Ad will apear here
Next
रत्नागिरी ग्राहक पेठेच्या दीपावली प्रदर्शनाचे उद्घाटन
महिला बचत गट व उद्योगिनींचे ५० स्टॉल्स
दीपावली प्रदर्शनाचे उद्घाटन करताना शीलावती तावडे. सोबत प्राची शिंदे, दिलीप भाटकर, संतोष तावडे, महेश गर्दे आणि उद्योगिनी.

रत्नागिरी :
सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी रत्नागिरी ग्राहक पेठेअंतर्गत आयोजित केलेल्या महिला बचत गट व उद्योगिनींच्या उत्पादनांच्या दीपावली प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजिका शीलावती तावडे यांच्या हस्ते झाले. रत्नागिरीतील साई मंगल कार्यालयात हे प्रदर्शन २२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नर्सरी उद्योजिका शीलावती तावडे यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या वेळी मरीनर दिलीप भाटकर, बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे आणि जाणीव फाउंडेशनचे महेश गर्दे, प्राची शिंदे आदी उपस्थित होते. शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत रोपटे देऊन केले.

दीपप्रज्वलन करताना शीलावती तावडे. शेजारी प्राची शिंदे, कॅप्टन दिलीप भाटकर, संतोष तावडे आणि महेश गर्दे.

प्राची शिंदे म्हणाल्या, ‘या प्रदर्शनाला उद्योगिनींच्या उत्पादनांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. किमान ३-४ प्रदर्शनात स्टॉल लावल्यानंतर अनेक महिलांनी दुकान सुरू केले. तरीही त्या अजूनही प्रदर्शनात भाग घेतात.’

मरीनर दिलीप भाटकर म्हणाले, ‘काताळे येथे आमच्या जहाज ब्रेकिंग उद्योगात उद्योगिनींना सुवर्णसंधी आहे. जहाज हे स्वतंत्र जग असते. त्यामुळे ते तोडताना त्यातील असंख्य प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये जातात. या वस्तू आपण येथेच घेऊन त्याची विक्री केल्यास उद्योगिनींना चांगली संधी मिळेल. जहाज दुरुस्ती उद्योगात तरुणी, महिला यश मिळवत आहेत. महिला कणखर असतात. जहाजाच्या स्वयंपाकगृहातील सर्व भांडी, इलेक्ट्रिक शेगडी, इस्त्री अशा असंख्य प्रकारच्या वस्तू घेऊन त्या विकता येतील. जानेवारीपासून हा उद्योग सुरू होणार आहे.’



महेश गर्दे यांनी जाणीव फाउंडेशनचे काम सांगतानाच उद्योगिनींच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्याकरिता मदत देण्याचे आश्वासन दिले. शीलावती तावडे यांनी प्रोत्साहनपर भाषण केले. 

संतोष तावडे यांनी सांगितले, ‘महिला एका उद्योगात स्थिर राहत नाहीत. चार महिला एकत्र येऊन अनेक वर्षे उद्योग वाढवत नेले पाहिजेत. यातून यश मिळत जाते.’



श्रद्धा तेरेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. सईदा बाग यांनी मनोगत व्यक्त केले. पहिल्या प्रदर्शनापासून सहभागी झालेल्या उद्योगिनी शुभांगी इंदुलकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रदर्शन २२ तारखेपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत खुले राहणार आहे. 

प्रदर्शनात दिवाळी फराळ, रेडिमेड कपडे, दागिने, खाद्यपदार्थ, शोभिवंत व गृहोपयोगी वस्तू असे विविध प्रकारचे ५० स्टॉल्स मांडले आहेत. लायन्स क्लबतर्फे महिलांची मोफत हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी, विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZURCF
Similar Posts
‘श्रद्धा’पूर्वक मेहनतीतून ‘समर्थ’तेकडे... रत्नागिरी : महिला स्वयंसाह्यता बचत गटांची चळवळ आता राज्यभरात चांगलीच फोफावली आहे; मात्र उत्तम आणि सातत्यपूर्ण कामगिरी दीर्घ काळ करणाऱ्या बचत गटांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. अशा दुर्मीळ बचत गटांमध्ये रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील श्रद्धा सबुरी गटाचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. या गटातील महिलांनी
देशासाठी पदक मिळवल्याचा आनंद अवर्णनीय : डॉ. निशिगंधा पोंक्षे रत्नागिरी : ‘कझाकस्तानमध्ये यंदा झालेल्या आशिया कप स्पर्धेत बायथले (Biathle) आणि ट्रायथले (Triathle) स्पर्धेत मी ५५ वर्षे गटात भाग घेतला. प्रचंड थंड पाण्यात पोहायचे, धावायचे, शूटिंग करायचे अशा प्रकारे क्षमतेचा कस लावणाऱ्या या वेगळ्या स्पर्धेत भारतासाठी मी दोन सुवर्णपदके मिळवू शकले. याचा आनंद अवर्णनीय आहे,’ अशा शब्दांत डॉ
रत्नागिरीत बचत गट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी ग्राहक पेठ व लायनेस क्लबच्या रिजन को-ऑर्डिनेटर प्राची शिंदे यांच्या विद्यमाने आठ ते ११ मार्च २०१९ या कालावधीत शहरातील साई मंगल कार्यालय येथे महिला बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
‘स्त्रियांनी कौशल्ये शिकून किमान चौघींना नोकरी द्यावी’ रत्नागिरी : ‘स्त्री सुसंस्कृत असेल, तर तिच्यामुळे मुले व घर सुधारते. त्यामुळे स्त्रीने व्यवसाय केला, तर सारे कुटुंबही या व्यवसायात मदत करते. बाया कर्वे स्त्री कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थिनी, गृहिणी, मुली शिकल्यानंतर त्यांनी स्वतः व्यवसाय सुरू करून किमान चार जणींना नोकरी द्यावी. म्हणजे या केंद्राचा उद्देश सफल होईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language